Pages

Sunday, 12 May 2013

कार्यक्रम घेण्यावर कार्यकर्ते ठाम

कार्यक्रम घेण्यावर कार्यकर्ते ठाम: पिंपरी । दि. ११ (प्रतिनिधी)

उद्घाटनाच्या कार्यक्रमाला दिलेली परवानगी पोलिसांनी ऐनवेळी कायदा सुव्यवस्थेचे कारण देऊन नाकारली. १२ मे रोजी निश्‍चित झालेला कार्यक्रम परवानगी नाकारली तरी घ्यायाचाच अशी आग्रही भूमिका युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

कामगारनेते प्रकाश चव्हाण युवा मंचाचे उद्घाटन आणि रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आयोजित केला आहे. कार्यक्रमाची तयारी झाली. सर्वत्र फ्लेक्स उभारले. परवानगी नाकारल्याचे ऐनवेळी पोलिसांनी कळविल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. नाकारायची होती तर अगोदर परवानगी दिली कशाला, असे त्यांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment