Pages

Monday, 24 June 2013

समस्या सोडविण्याचे आश्‍वासन

समस्या सोडविण्याचे आश्‍वासन: वाकड : आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसाने काही भागाची दैना केली असून, दळणवळणाच्या माध्यमावर त्याचा दुष्परिणाम झाला आहे. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या अनेक गावांना सुविधा पुरविण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे. त्याचा प्रत्यय या पावसात आला आहे. याच पावसाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या अधिकार्‍यांनी पुनावळे गावाला भेट दिली. समस्या जाणून घेतल्या व त्यावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन या वेळी दिले.

गावातील अंतर्गत रस्ते, गटारे,भुयारी मार्ग, महामार्गाखालील पूल, मलनिस्सारणाची सोय याची पाहणी केली. महामार्गाखालील पुलाचीही आवर्जून पाहणी करण्यात आली. तेव्हा देखील पुलाखाली पाण्याचा प्रचंड साठा होता. या पाण्याचा निचरा होत नसल्याने येथे प्रचंड पाणी जमा झाल्याने वाहतूक ठप्प होते.

No comments:

Post a Comment