Pages

Monday, 8 July 2013

आंदोलन तीव्र करू; फेरीवाल्यांचा इशारा

पिंपरी : महानगरपालिकेत फेरीवाल्यांवर अन्याय केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाकडून सभेत देण्यात आला. 
महासंघातर्फे आकुर्डी प्राधिकरण येथे फेरीवाल्यांवरील वारंवार होत असलेली कारवाई व इतर प्रश्नांवर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी एकमुखाने वरील निर्णय घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते डॉ. सुरेश बेरी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते होते.

No comments:

Post a Comment