Pages

Monday, 9 September 2013

साहित्य खरेदीसाठी चाकणला झुंबड

चाकण : गणेशोत्सव एका दिवसावर येऊन ठेपल्याने तयारीसाठी, तसेच सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांची परिसरातील बाजारात झुंबड उडत आहे. शहरात गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, शहरातील मोक्याच्या ठिकाणी ५0 ते ६0 गणेशमूर्तींचे स्टॉल्स लागले आहेत. सजावटीच्या साहित्यांनी दुकाने थाटली असून, साहित्य घेण्यासाठी बाजारपेठ गजबजली आहे. या बाजारात तीन कोटींची उलाढाल होण्याची शक्यता व्यापार्‍यांनी वर्तवली आहे.

No comments:

Post a Comment