Pages

Thursday, 10 October 2013

नियमितीकरण प्रश्न अभ्यासपूर्ण मांडावा

पिंपरी : अधिकार्‍यांनी चुकीच्या पद्धतीने सादर केलेल्या शपथपत्रामुळे अवैध बांधकामांवरील कारवाई होत आहे. याबद्दल स्थायी समिती सभेत पदाधिकारी, सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. अवैध बांधकामे नियमितीकरणासंदर्भात महापालिकेने न्यायालयात अभ्यासपूर्ण बाजू मांडावी. कारवाई अशीच पुढे सुरू राहिल्यास कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, अशी भीती स्थायी समिती सभेत सदस्यांनी व्यक्त केली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती नवनाथ जगताप होते. 

No comments:

Post a Comment