Pages

Tuesday, 8 October 2013

खिळे टाकून वाहने पंक्चरचे वाढते प्रकार

रहाटणी : रस्त्यावर विविध प्रकारचे खिळे टाकून वाहने पंक्चर करण्याचे प्रमाण वाढल्याचे शहरात ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी स्पाइन रस्त्यावर दररोज असाच प्रकार घडत होता. मात्र, काही जागरूक नागरिकांनी खिळे टाकणार्‍या व्यक्तीला पकडून पोलिसाच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर काहीसा प्रकार थांबला होता. हाच प्रकार सध्या रहाटणी परिसरात घडत आहे. गतिरोधकाच्या दोन्ही बाजूला खिळे टाकले जात आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहने पंक्चर होत असल्याने चालक संताप व्यक्त करीत आहेत.

No comments:

Post a Comment