Pages

Tuesday, 21 January 2014

आधार न मिळाल्याने नागरिक हवालदिल

किवळे : पिंपरी- चिंचवड महापालिका हद्दीतील विकासनगर ( किवळे) मावळ तालुक्यातील सांगवडे परिसरातील अनेक नागरिकांनी सहा-सात महिन्यांपूर्वी देहूरोड येथे आधार नोंदणी केली आहे. मात्र अद्यापही अनेकांना आधार क्रमांक मिळाला नाही. त्यामुळे सिलिंडरचे अनुदान मिळणार नसल्याने नागरिक हवालदिल असून, केंद्र सरकारने नोंदणी केलेल्या सर्वांना आधार कार्ड क्रमांक मिळाल्यानंतरच बँकेच्या खात्यावर थेट अनुदान जमा करण्याची योजना सुरू करावी, अशी मागणी होत आहे. 

No comments:

Post a Comment