Pages

Wednesday, 26 February 2014

७0 जागांसाठी धावले ११ हजार जण

पिंपरी : महापालिकेच्या रखवालदार पदाच्या ७0 जागांकरिताच्या भरतीसाठी ११ हजार उमेदवार धावले. त्यांची शारीरिक चाचणी घेतल्यानंतर नियोजनानुसार १६ फेब्रुवारीला यादी जाहीर न झाल्याने उमेदवार, त्यांचे पालक संभ्रमात पडले आहेत. प्रशासनाने मात्र संगणकावर माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे कारण पुढे केले आहे. निवड झालेल्यांची लेखी परीक्षा कधी, हे निश्‍चित नाही. अंतिम फेरीपर्यंत केवळ २१0 जण पोहोचणार, हे मात्र निश्‍चित आहे. 

No comments:

Post a Comment