Pages

Thursday, 27 February 2014

शहरात तीन महिलांच्या सोनसाखळ्या ...

शहरातील सांगवी, चिंचवड आणि निगडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी महिलांच्या सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार घडले आहेत. या सोनसाखळी चोरच्या घटनांमध्ये सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. शहरातील ब-याच वरिष्ठ व कनिष्ठ अधिका-यांची नुकतीच खांदेपालट झाली. परंतू, पदभार स्विकारताच या अधिका-यांपुढे सोनसाखळी चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे.

रजिया हुसेन शेख (वय- 38, रा. श्रीनगर, रहाटणी) यांनी सांगवी, दया अशोक माशेरे (वय- 50, रा. धोबीमळा, मंचर) यांनी चिंचवड आणि सरस्वतीअम्मा कुट्टन पिल्ले (वय- 65, रा. आकुर्डी ) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

No comments:

Post a Comment