Pages

Monday, 10 March 2014

दक्षता संघातर्फे निगडी पोलिसांचा सत्कार

निगडी पोलिसांनी वाहनचोरी करणारी टोळी पकडल्याबद्दल त्यांचा पोलीस मित्र नागरिक दक्षता संघातर्फे सत्कार करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाईक-पाटील व गुन्हे पोलीस निरीक्षक पी. एन. सुपेकर यांनी हा सत्कार स्वीकारला.
निगडी पोलिसांनी काही दिवसापूर्वी शहरात वाहनचो-या करणा-या टोळीला गजाआड केले. त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे. या हेतुने पोलीस मित्र नागरी दक्षता संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष मनोहर दिवाण, सचिव पोपट आरणे, इम्तियाज बागवान, विकास साखरे, सुनील चौगुले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment