Pages

Tuesday, 4 March 2014

अनधिकृत फलक, स्टीकर्स काढा ; पाहणी दौऱ्यात आयुक्तांचे आदेश

शहरातील नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठी सर्व प्रभागांमध्ये स्वच्छता ठेवा, शहराच्या सौंदर्यीकरणाला बाधा आणणारे पोस्टर्स, बॅनर्स, स्टीकर्स तातडीने काढा, असे आदेश आयुक्त राजीव जाधव यांनी आज पहिल्या प्रभाग दौ-यात दिले. चापेकर स्मारकाचे काम लवकरात लवकर करुन चौकाचे सुशोभिकरण करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
महापालिकेच्या 'ब' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या भागाची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर झालेल्या नगरसवेक व अधिका-यांच्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. तसेच दर तीन महिन्यांनी आढावा दौरा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ब प्रभाग अध्यक्ष शेखर ओव्हाळ, नगरसेवक संदीप चिंचवडे, अनंत को-हाळे, संपत पवार, नीलेश बारणे, माजी महापौर अपर्णा डोके नगरसदस्या शमीम पठाण, विमल जगताप, छाया साबळे, माया बारणे, अश्विनी चिंचवडे, आशा सूर्यवंशी, तसेच अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, शहर अभियंता एम.टी. कांबळे, क्षेत्रीय अधिकारी सुभाष माछरे, सहायक आयुक्त सतीश कुलकर्णी, आरोग्य कार्यकारी अधिकारी राजाराम चव्हाण, कार्यकारी अभियंता शरद जाधव,

No comments:

Post a Comment