Pages

Thursday, 20 March 2014

आकुर्डी येथे गुरुवारी मतदान जनजागृती कविसंमेलन

शब्दधन काव्यमंच आणि साहित्य संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मतदानाच्या कवितांचे पहिले 'मतदान जनजागृती कविसंमेलन गुरूवारी (दि. 27) आकुर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. 
ग्रीव्हज औद्योगिक सहकारी वसाहत सभागृह याठिकाणी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असून यावेळी पर्यावरण संवर्धन समितीचे सचिव हेमंत माताडे, सरदार वल्ल्भभाई पटेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पाटील, शब्दधन काव्यमंचचे कार्याध्यक्ष सुभाष चव्हाण, सचिव अण्णा जोगदंड, तानाजी एकोंडे तसेच साहित्य संवर्धन समितीच्या कार्याध्यक्ष शोभा जोशी, उपाध्यक्ष आय.के. शेख, सचिव सुहास घुमरे, सहसचिव अ‍ॅड. अंतरा देशपांडे आदी उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment