Pages

Monday, 31 March 2014

महामार्गावर खिळे टाकण्याचा उद्योग पुन्हा सुरू !

पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यावर खिळे टाकून वाहनांचे टायर पंक्चर करण्याची पद्धत ही जुनीच आहे. मागील वर्षी या प्रकाराने वाहनचालकांना जेरीस आणले होते. काही काळाच्या विश्रांतीनंतर आता खिळे टाकून वाहने पंक्चर करण्याच्या प्रकारास पुन्हा सुरूवात झाली आहे. या प्रकारामुळे अनेक वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पुणे- मुंबई महामार्गावर आकुर्डी ते निगडी या रस्त्यावर मागील दोन दिवसापासून रात्रीच्या वेळी खिळे टाकून वाहनांचे टायर पंक्चर करण्याचा गोरख धंदा पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment