Pages

Saturday, 8 March 2014

ओढ्याचा प्रवाह बदलण्याचा डाव ...

पिंपळे गुरव येथील ओढ्याचा प्रवाह काटकोनात वळविण्यास मनसे पर्यावरण विभाग; तसेच स्थानिक नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे सद्य:स्थितीत हे काम थांबविण्यात आले आहे.
मनसे पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष राजू सावळे यांनी याबाबत अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मनसेचे गटनेते अनंत कोऱ्हाळे, शिवाजी पाडुळे, दीपक कोकीळ, कृष्णा सोनवणे उपस्थित होते. प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे देखील सावळे यांनी याबाबत तक्रार दिली. त्या अर्जावर 45 स्थानिक नागरिकांच्या स्वाक्ष-या आहेत.

No comments:

Post a Comment