Pages

Friday, 28 March 2014

भिरभिरताहेत छोटी हेलिकॉप्टर

संजय माने, पिंपरी
मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीअर्ज भरतेवेळी बुधवारी महापालिका आवारात झालेल्या गर्दीच्या ठिकाणी ५0 ते ६0 फूट उंचीवर खेळण्यातील हेलिकॉप्टरसारखे छोट्या आकारातील भिरभिणारे ‘कॉडकॉप्टर’ नागरिकांच्या दृष्टिपथास आले. उमेदवारीअर्ज भरण्यासाठी गर्दी झाली असताना, भिरभिरणारे छोटे कॉडकॉप्टर उपस्थितांसाठी कुतूहलाचा विषय ठरले. गर्दीच्या ठिकाणी उंचावरून गर्दीचे छायाचित्रण करून सर्व्हेक्षणाच्या कामात हे ‘कॉडकॉप्टर’ उपयुक्त असल्याने त्यामुळे अशा हायटेक यंत्रणेसाठी खर्च करण्यास उमेदवार तयार होत असल्याची प्रचिती या निमित्ताने आली.

No comments:

Post a Comment