Pages

Saturday, 12 April 2014

पालिकेच्या प्रभाग कार्यालयांत शुकशुकाट

पिंपरी : निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने याचा परिणाम शासकीय कार्यालयांतील कामकाजांवर झाला आहे. महापालिकेच्या प्रभाग कार्यालयांतही नेहमीची वर्दळ कमी झाल्याचे दिसून आले. 
प्राधिकरण निगडी येथील भेळ चौकात महापालिकेचे ‘अ’ प्रभागाचे कार्यालय आहे. यासमोरील पार्किंगमध्ये इतरवेळी जागा उपलब्ध नसते. समोरील रस्त्यावर नागरिकांना वाहने लावावी लागतात. मात्र, हे पार्किंग मोकळेच दिसून आले. तसेच मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी येणार्‍या नागरिकांच्या संख्येवरही परिणाम झाला आहे. 

No comments:

Post a Comment