Pages

Tuesday, 22 April 2014

विशेष स्वच्छता मोहिमेत आयुक्तांनी उचलला कचरा

वेळ सकाळी आठची..., विशेष स्वच्छता मोहिमेचा पहिला दिवस..., आकुर्डी रेल्वेरुळालगतच्या मोकळ्या प्लॉटपासून मोहिमेची सुरुवात होणार होती..., आयुक्त राजीव जाधव तेथे आले आणि थेट कचरा उचलायला सुरुवात केली..., आयुक्तच 'ऑन फिल्‍ड' उतरल्याचे पाहून त्यांच्यासोबतचा अधिका-यांचा फौजफाटाही कामाला लागला..., अन् पाहता-पाहता दोन तासातच दोन ट्रक कचरा गोळा झाला. 
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी आजपासून विशेष स्वच्छता मोहिम सुरु केली आहे. प्रशासकीय कामकाजावर कोणताही ताण पडू नये यासाठी कार्यालयीन कामकाज सुरु होण्यापूर्वी सकाळी आठ ते दहा अशी वेळ निवडण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment