Pages

Sunday, 5 February 2017

पैसे घेऊन भाजपाने उमेदवारी विकल्या


‘सर्व्हे’त ज्यांचे नाव येईल अशांनाच उमेदवारी देण्यात येईल, असे भारतीय जनता पार्टीकडून जाहीर करण्यात आले होते; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुशीत तयार झालेल्या  व स्वार्थासाठी भाजपामध्ये आलेल्या नेत्यांनी पक्षाचे आचारविचार पायदळी तुडविले आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी ‘सर्व्हे’च्या नावाखाली निष्ठावंत कार्यकर्त्यांची गळचेपी करून पैसे देणार्‍यांनाच महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याचा खळबळजनक आरोप उमेदवारी डावललेल्या निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप आणि आ. महेश लांडगे यांचे नाव घेता केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ‘शहराध्यक्ष हटाव, भाजपा बचाव’ अशा घोषणा देऊन आता ‘माघार नाही,’ असा पवित्रा घेतल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपामधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

No comments:

Post a Comment