Pages

Tuesday, 25 April 2017

नऊ जणांवर खोट्या गुन्ह्याद्वारे कारवाईचा आरोप

खराळवाडी खून प्रकरण : पोलीस आयुक्‍तांना निवेदन
पिंपरी, (प्रतिनिधी) – खराळवाडी येथील झालेल्या खुन प्रकरणात नऊ जणांना विनाकारण गोवण्यात आले आहे. पोलिसांकडून केवळ तपासासाठी बोलवण्यात आलेल्या नऊ जणांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. त्यांचा खुनाची काही संबंध नसतानाही त्यांच्यावर पोलिसांकडून झालेली कारवाई दबावाखाली करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बाबत माजी नगरसेवका निर्मला कदम यांच्यासह सुमारे वीस महिलांनी पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्याकडे त्याचे निवेदन दिले आहे.

No comments:

Post a Comment