Pages

Thursday, 25 May 2017

जैवविविधता समितीच्या निवडीला विलंब!

जागतिक जैवविविधता दिवस : अध्यक्ष व सदस्य निवडीसाठी महापौरांना पत्र
पिंपरी,  (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील दुर्मिळ जैव विविधतेचे संवर्धन आणि जतन व्हावे, याकरिता केंद्र सरकारच्या आदेशाने जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. सोमवारी जागतिक जैवविविधता दिवस साजरा होत असताना महापालिकेची जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सदस्यांची निवड सत्ताधारी भाजपकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे गेली दोन महिने झाले जैवविविधता समिती निवडीस विलंब झाला आहे. याबाबत पर्यावरण विभागाने महापौर नितीन काळजे यांना पत्र देवून जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment