Pages

▼

Thursday, 1 June 2017

खासदार आढळरावांचे “आरटीआय’अस्त्र!

– प्रशासनावर आरोप : विकासकामांवर आवस्तव खर्च 
– महापालिका आयुक्‍तांकडे माहिती मागवली
पिंपरी,  (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाला “कोंडी’त पकडण्यासाठी शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शहरातील पाणी कपातीवरुन भाजपला लक्ष्य करतानाच आता सेना नेत्यांनी विकास प्रकल्पांवर अवास्तव खर्च सुरु आहे, असा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे विविध प्रकल्पांची इत्त्यंभूत माहिती मागवली असून, वेळेत माहिती न दिल्यास “सीबीआय’कडे तक्रार करणार आहे, असा इशाराही दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्‍यता आहे.

No comments:

Post a Comment