Pages

Saturday, 24 June 2017

ताडपत्री खरेदी गैरव्यवहाराची चौकशी सुरूच नाही

आयुक्तांची माहिती : चौकशी समिती नेमल्याचा दावा खोटा
 पिंपरी, (प्रतिनिधी) – पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांना भेट देण्यासाठी केलेल्या ताडपत्री खरेदीतील गैरव्यवहाराबाबत आयुक्तांनी त्रीसदस्यीय चौकशी समिती नेमल्याचा दावा स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी केला होता. त्यांचा हा दावा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी फेटाळला असून प्रशासनाकडून कोणतीही चौकशी अद्याप सुरू केली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ताडपत्री खरेदी, गैरव्यवहार व चौकशीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment