80 टक्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे बक्षिस देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या शाळेतील 31 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यामध्ये 90 टक्यांहून अधिक गुण घेणा-या विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांचे बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी सात विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
No comments:
Post a Comment