पिंपरी-चिंचवड शहरासाठी भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्याचा साधा विकास आराखडा देखील अद्यापपर्यंत तयार झाला नाही. ही महत्वाची कामे करणे गरजेचे असताना पालिका महामार्गाची कामे करण्यासाठी आग्रही कशासाठी आहे? असा सवाल शिवसेनेचे शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.
No comments:
Post a Comment