Pages

Monday, 10 July 2017

“रिंगरोड’ बाधितांच्या आंदोलनाचा आमदार, खासदारांना फटका?

पिंपरी – प्रस्तावित “रिंगरोड’ बाधीत नागरिकांच्या आंदोलनाचा फटका स्थानिक खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांना बसण्याची शक्‍यता आहे. लोकप्रतिनिधींनी या विषयाला सोयीस्कर बगल दिल्यामुळे बाधीत कुटुंबातील सुमारे पाच हजार मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. मात्र, शहराच्या विकासाच्या दृष्टीकोणातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यामुळे मतांच्या राजकारणात “रिंगरोड’ला “स्पीड ब्रेक’ लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी चर्चा राजकीय जाणकारांमध्ये सुरू आहे.

No comments:

Post a Comment