Pages

Monday, 3 July 2017

ज्ञानप्रबोधिनीला कबड्डीत विजेतेपद

पिंपरी – प्रो-कबड्डी लिगमधील पुणेरी पलटणमार्फत झालेल्या आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत निगडी प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी क्रीडाकुलाच्या संघाने विजेतेपदाचा मान मिळविला.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निकेतन, पुणे संघाचा 45-14 असा 51 गुणांच्या फरकाने पराभव केला. विजेत्या संघाच्या अंकीता बोडके, सरिता गोयेकर, यांनी उत्कृष्ट खेळ केला. पूनम कोकाटे, वैष्णवी शेरकर यांनी आक्रमक चढाया केल्या. याशिवाय कविता गुंजवटे, निकीता जाधव, प्रतिक्षा कदम, गौरी जाधव, श्रावणी पानसे, शिवानी जाधव यांनीही चांगली कामगिरी केली. या स्पर्धेत रुणाली जाधव हिने उत्कृष्ट खेळाडूचा मान मिळवला.

No comments:

Post a Comment