Pages

Monday, 7 August 2017

मोशीचे ट्रक टर्मिनलचे आरक्षण रद्द करा- महापौर काळजे

पिंपरी– पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ट्रक टर्मिनल आरक्षण रद्द करण्यात यावे, अशी मागणी महापौर नितीन काळजे यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केलेली आहे. मोशी येथील तापकीरनगर, साईकृपा कॉलनी, सहयोग कॉलनीतील नं.1,2,3 व 4 याठिकाणी नागरी वस्ती आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात सर्व्हे नंबर 452/1/1 असून, त्या जागेवर ट्रक टर्मिनल्सचे आरक्षण आहे. मोशी गावाचा महापालिका हद्दीत समावेश झालेला आहे. सदरील जागेच्या परिसरात ग्रामपंचायत कालावधीपासून नागरिकांचे वास्तव्य आहे. त्या नागरिकांच्या मिळकतीही आहेत. त्या मिळकतींची नोंद महापालिकेकडे असून, तेथील रहिवाशी मिळकतकर भरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी ट्रक टर्मिनल्सचे आरक्षण रद्द करण्याची मागणी केलेली आहे. या रहिवाशी नागरिकांच्या मागणीचा विचार करुन हे आरक्षण रद्द करण्यात यावे, असे काळजे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment