Pages

Thursday, 3 August 2017

[Video] पिंपरी भाजी मंडईची महापौर, आयुक्तांकडून पाहणी; सुविधा पुरविण्याच्या सूचना

एमपीसी न्यूज - पिंपरीतील भाजी मंडईची महापौर नितीन काळजे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (बुधवारी) पाहणी केली. विक्रेत्यांकडून समस्या जाणून घेतल्या. तसेच भाजी मंडईतील असुविधा दूर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, सचिव डॉ.पी.एल. इंगळे, उप मुख्यप्रशासक भुषण तुपे, पिंपरी मार्केटयार्डचे विभागप्रमुख राजू शिंदे आदी उपस्थित होते. पिंपरी भाजी मंडईतील विविध समस्या सोडविण्यासाठी महापौर काळजे यांनी अधिकारी, भाजी मंडईतील पदाधिका-यांसोबत बैठक घेतली होती. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.

No comments:

Post a Comment