Pages

Sunday, 17 September 2017

भोसरीत रंगणार आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा फड

पिंपरी – पुढील महिन्यात भोसरीत महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त या स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंची कुस्त्यांचे डाव पाहण्याचा थरार कुस्ती शौकीनांना अनुभवता येणार आहे.
महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात झालेल्या या बैठकीला क्रीडा समिती सभापती लक्ष्मण सस्ते, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, सहाय्यक आयुक्त योगेश कडूसकर, कार्यकारी अभियंता संजय घुबे, नितीन देशमुख, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघटनेचे व महेशदादा स्पोर्टस फाउंडेशनचे पदाधिकारी, युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते, मुंबई महापौर केसरी अजय लांडगे तसेच पै. धनराज करंजवणे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment