Pages

Friday, 20 October 2017

महापालिकेच्या इंधनावर कुठेही फिरा!

पिंपरी – स्वत:चे खासगी वाहन वापरणाऱ्या महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांना वाहनांतून फिरण्याकरिता वाहन भत्ता निश्‍चित करण्यात आला आहे. त्यानुसार 10 लाखापेक्षा जादा किमतीचे वाहन वापरणाऱ्या महापौर आणि आयुक्तांना 67 हजार रूपये मिळणार आहेत. सहा लाख रूपये किमतीपर्यंतचे वाहन वापरणाऱ्या इतर पदाधिकारी आणि वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना 40 हजार रूपये तर वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांना 33 हजार रूपये प्रतिपूर्ती रक्कम दरमहा मिळणार आहे. महापालिका सर्वसाधारण सभेत या निर्णयास मंजुरी देण्यात आली.

No comments:

Post a Comment