Pages

Tuesday, 17 October 2017

कामचुकार कर्मचाऱ्यांना प्रशासनाचे पाठबळ?

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पालिका सेवेते कार्यरत असताना काही कर्मचारी कार्यालयात सकाळी हजेरी लावल्यानंतर आपले खासगी उद्योग चालविण्यासाठी निघून जात असल्याचे निदर्शनास येऊनही प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही. अशा नियमबाह्य पध्दतीने नोकरी करून गलेलठ्ठ पगार लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठिशी घालण्याचा उद्योग प्रशासन करत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपध्दतीवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment