Pages

Monday, 9 October 2017

भाजप नगरसेवकांमध्ये खदखद ?

विकास कामे होत नसल्याची नाराजी : नागरिकांच्या तक्रारी वाढल्या
पिंपरी – पावसाळ्यातही पाणी टंचाई, शैक्षणिक गुणवत्तेचा ढासळता आलेख अन्‌ सर्वच प्रभागांमध्ये मुलभूत सुविधांची वानवा झाल्याने नागरिकांच्या तक्रारींचा भडीमार वाढला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आयुक्त किंवा प्रभाग अधिकाऱ्यांकडूनही समाधानकारक तोडगा मिळत नाही. त्यातच नागरीकांच्या तक्रारी वाढल्याने सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांची राजकीय वाटचाल खडतर सुरू आहे. त्यामुळे भाजपचे नगरसेवक स्वपक्षीय महापालिकेतील पदाधिकाऱ्यांवर खासगीत तोफ डागू लागले आहेत.

No comments:

Post a Comment