Pages

Friday, 15 December 2017

दापोडीतील 300 मीटरचा रस्ता तातडीने करा

पिंपरी – पुणे-मुंबई महामार्गावर महामेट्रोचे काम युध्द पातळीवर सुरू असल्याने मुंबईकडून येणारी वाहतूक दापोडीतील काटे रेल्वे उड्डाणपूल येथून औंध, पिंपळे गुरव आणि सांगवीमार्गे जात असल्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी शितळा माई चौक ते नदी पात्रावरील डी. बी. पाटील रिव्हर रोडपर्यंतचा 300 मीटरचा प्रलंबित रस्ता तातडीने तयार करण्यात यावा, अशी मागणी दापोडीतील नागरिकांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment