Pages

Thursday, 7 December 2017

32 गुन्ह्यातील सराईत जेरबंद

  • साडेतेरा लाखांचा ऐवज जप्त : निगडी पोलिसांची कारवाई
पिंपरी, (प्रतिनिधी)- वाहनांची तपासणी करताना संशयावरुन ताब्यात घेतलेला तरुण तडीपार गुन्हेगार निघाला. त्याने 32 गुन्हे केल्याचे तपासात समोर आले असून, त्याच्याकडून 40 तोळे सोने, रोख पन्नास हजार रुपये व एक मोटार सायकल असा एकूण 13 लाख, 57 हजार, 660 रुपयांचा ऐवज निगडी पोलिसांनी जप्त केला. निगडी ठाण्याच्या हद्दीतील पाच गुन्ह्यांसह पुणे शहरातील 27 गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. मुकेश उर्फ मुन्ना उर्फ धन्या उर्फ धनंजय बबन मुने (वय21, सध्या रा. सुतारदरा, दत्तमंदीराजवळ, कोथरुड, पुणे मूळगाव पागोरी पिंपळगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे.

No comments:

Post a Comment