Pages

▼

Wednesday, 27 December 2017

स्वच्छ सर्वेक्षणाचा खेळखंडोबा?

पिंपरी – एकीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरात स्वच्छ सर्वेक्षणाची जोरदार तयारी सुुरु आहे, तर दुसरीकडे छोट्या-मोठ्या जाहिरात एजन्सीने बस स्टॉप, सार्वजनिक ठिकाणी, विविध वृक्षांना खिळे ठोकून जाहिरातीचे लावल्या जात आहेत. तसेच मराठी चित्रपटाची भिंत्तीपत्रके (पोस्टर) अनेक भागात चिकटविली जात असून काही विद्युत खांबाला देखील पोस्टर लावण्यात आलेली आहेत. या अनधिकृत जाहिरातीमुळे शहराचे विद्रुपीकरण वाढले असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्यास क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

No comments:

Post a Comment