Pages

Thursday, 21 December 2017

‘पारदर्शक’ सत्ताधाऱ्यांचा तिजोरीवर डल्ला?

– रस्त्यांच्या कामात सुमारे 60 कोटींचा भुर्दंड 
– सर्व कामांची फेरनिविदा काढण्याची मागणी
पिंपरी – स्वच्छ पारदर्शकतेच्या नावावर सत्ताधारी भाजप करदात्यांच्या पैशावर डल्ला मारु लागले आहेत. 425 कोटी रस्त्यांच्या कामात पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी संगनमताने “रिंग’ केली आहे. त्या गैरकारभाराला थांबविण्याऐवजी आयुक्‍त श्रावण हर्डीकर हे पाठराखण करीत आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या कामात निश्‍चितपणे “रिंग’ झाली असून सर्व कामांच्या फेरनिविदा काढण्यात याव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी बुधवारी (दि.20) पत्रकार परिषदेत केली. यावेळी नगरसेवक अजित गव्हाणे, दत्ता साने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment