Pages

Monday, 1 January 2018

पवनाथडीच्या खर्चात कपात केल्याने कलावंतीणीवरील प्रेमापोटी संजोग वाघेरेंना जळफळाट – लक्ष्मण जगताप

पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचे कलावंतीणीवर असलेले प्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळे पवनाथडी जत्रेवर होणाऱ्या खर्चात कपात केल्याने वाघेरेंच्या भावना दुखावणे साहजिक आहे. मी विरोधी पक्षाचा आमदार असतानाही माझे ऐकून पवनाथडी जत्रेवर खर्च केला जात होता, असे म्हणणाऱ्या वाघेरे यांची कीव करावीशी वाटते. सत्ता असताना राष्ट्रवादीने समाविष्ट गावांच्या विकासाकडे नेहमीच दुर्लक्ष केले. आता भाजपने या गावांमध्ये विकासाची गंगा पोचविण्याचा निर्णय घेतल्यानंतर वाघेरे यांना पोटशूळ उठले आहे. समाविष्ट गावांतील विकासासाठी ४२५ कोटींच्या खर्चाला मंजुरी देताना गडबड झाली असेल, तर वाघेरे यांनी त्याचे पुरावे द्यावेत. भाजप दोषींना अजिबात पाठीशी घालणार नाही. आपली दुकानदारी कायमची बंद झाली म्हणून वाघेरे यांनी उगाच बोंबाबोंब करू नये, अशा शब्दांत भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी वाघेरे यांचा समाचार घेतला आहे.

No comments:

Post a Comment