Pages

Saturday, 13 January 2018

सलमानच्या एका झलकसाठी पिंपरीत तुडूंब गर्दी उसळली

पिंपरी (Pclive7.com):- प्रसिध्द सिनेअभिनेता सलमान खान याला पाहण्यासाठी पिंपरीत तुडूंब गर्दी उसळली आहे. पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सच्या पिंपरी येथील भव्य शोरूमचे उद्घाटन आज सलमानच्या हस्ते होणार आहे.

पिंपरीत पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सच्या भव्य शोरूमचे उद्घाटन सलमान खानच्या हस्ते होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पु.ना.गाडगीळने त्याची जोरदार जाहिरातबाजी केली होती. संपूर्ण शहरभर तसे फलकही लावले होते. त्यामुळेच आज दुपारी ४ वाजल्यापासून पिंपरीतील क्रोमा शोरूमच्या शेजारी सलमानच्या चाहत्यांनी गर्दी करायला सुरूवात केली होती. प्रचंड प्रमाणात झालेल्या गर्दीमुळे शगुन चौक पासून पिंपरी चौकापर्यंत वाहनांच्या लांबच्यालांब रांगा लागल्या होत्या. चाहत्यांच्या झालेल्या या गर्दीला रोखण्यात पोलीसांची चांगलीच दमछाक झालेली पहायला मिळत आहे. या शोरूमला खाजगी गार्डसचा विळखा आहे. काही वेळातच सलमानचे याठिकाणी आगमन होणार असून चाहत्यांची प्रतिक्षा शिगेला पोहचली आहे.

No comments:

Post a Comment