Pages

▼

Sunday, 14 January 2018

संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने सोमवारी रोजगार मेळावा

पिंपरीतील संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने सोमवार (दि.१५ जानेवारी) रोजी सकाळी १० वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन खासदार अमर साबळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे महापौर नितीन काळजे, आमदार तथा भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, ज्येष्ठ नेते आझम पानसरे आदी उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment