Pages

Wednesday, 3 January 2018

चिंचवडमध्ये नागरिकांचा स्वयंस्फुर्तीने बंद

वाल्हेकरवाडी : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत चिंचवड, वाल्हेकरवाडी व परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून संपला पाठींबा दिला. यावेळी काढलेल्या निषेध मोर्चामध्ये आंबेडकर अनुयायांनी महापुरुषांच्या नावाने जयघोष केला. यावेळी असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला होता. घटनेचा निषेध करण्यासाठी दलित बांधवानी जमून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा नागसेन वस्ती बिजलीनगर येथून वाल्हेकरवाडीतील रत्न्संभव बुद्ध विहारापर्यंत काढण्यात आला. सकाळपासून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला होता. बंदच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास २० पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

No comments:

Post a Comment