Pages

Monday, 8 January 2018

स्थायी सभापतीपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या नवीन आठ सदस्यांना चिठ्ठीद्वारे जानेवारी महिनाअखेरीस बदलण्यात येणार आहे. मात्र, स्थायी सदस्यांपेक्षा स्थायी समिती सभापती बदलांचे वारे जोरदार वाहू लागले आहे. विद्यमान सभापती सीमा सावळे यांची मुदत 1 मार्च 2018 रोजी संपणार असल्याने सभापती पदावर अनेक इच्छुक नेत्यांकडे दावा करु लागले आहेत. आतापासून सत्ताधारी भाजपमध्ये स्थायी समिती सभापती पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी होवू लागली असून तूर्तास स्थायी समिती सदस्य पद पदरात पाडून घेण्यासाठी पालिका कारभाऱ्यांच्या घरांचे उंबरे इच्छुकांकडून झिजवले जात आहेत.

No comments:

Post a Comment