Pages

Monday, 26 February 2018

अबब! रस्ता दुरुस्तीसाठी सव्वीस कोटी

पिंपरी – भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बालेकिल्ल्यातील रस्ते खर्चासाठी कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहेत. पिंपळे गुरव येथील दापोडी पुल ते तुळजाभवानी तसेच सृष्टी चौकापर्यंत 18 मीटर रस्त्याची दुरूस्ती करून अद्यावतीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 18 कोटी 26 लाख 26 हजार एवढा खर्च केला जाणार आहे. तर, काटे पुरम ते मनपा शाळेपर्यंतच्या रस्त्यासाठी आठ कोटींचा खर्च होत आहे. दोन्ही रस्त्यांसाठी 26 कोटी खर्चाला मंजुरीसाठी प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात आल्याने भुवया उंचावल्या आहेत.

No comments:

Post a Comment