Pages

Monday, 5 February 2018

महापालिकेकडून महिलांना कुंगफूचे धडे

पिंपरी – महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न सर्वत्र ऐरणीवर आला आहे. शाळा, कॉलेज आणि घराबाहेर पडल्यानंतर अनेकदा महिला, मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे महिला, मुलींना घराबाहेर पडल्यानंतर स्वतःची सुरक्षा करता यावी, त्या आत्मनिर्भर, सक्षम आणि स्वावलंबी व्हाव्यात, याकरिता महापालिका हद्दीतील महिला, मुलींना पुणे जिल्हा स्पोटर्स कराटे असोसिएशनच्या सहकार्याने कराटेचे प्रशिक्षण देण्यास महिला व बालकल्याण समितीने मान्यता दिली.

No comments:

Post a Comment