Pages

Tuesday, 10 April 2018

शास्तीकराच्या विरोधात शिवसेना महामोर्चा काढणार..!

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांवर लावलेला शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेवर महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तत्पूर्वी शहरात सर्वत्र नागरिकांच्या बैठका घेऊन जनजागृती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment