Pages

Sunday, 15 April 2018

पिंपरी- चिंचवड महापालिका प्रभाग क्र. १७ मध्ये विकासकामांना वेग

चौफेर न्यूज – पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये प्रभागातील विविध विकास कामांना सुरुवात झाली आहे. प्रभागातील वारंवार उद्‌भवणाऱ्या पिण्याच्या पाण्याची तसेच सांडपाण्याच्या समस्या नियोजनासंदर्भातील विकासकामांनी वेग धरला आहे. भाजपाचे नगरसेवक नामदेवराव ढाके यांच्या वारंवार सुरु असलेल्या पाठपुराव्याने आगामी काळातील अडचणींचा विचार करून विकासकामे मार्गी लावण्यात येत आहेत.

No comments:

Post a Comment