Pages

Friday, 6 April 2018

शिक्षण समितीची घंटा वाजणार?

पिंपरी – राज्यातील सर्व महापालिकांमध्ये शिक्षण समिती गठीत करण्याचे आदेश राज्य सरकारच्या शिक्षण मंडळाकडून मिळाल्यानंतरही पिंपरी-चिंचवड महापालिकेत वर्षभर रखडलेली ही प्रक्रिया आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. त्याकरिता येत्या सर्वसाधारण सभेत महापालिकेच्या चार विषय समित्यांच्या नवीन सदस्य नियुक्तीची प्रक्रिया सुरु झाली असून, बहुचर्चित शिक्षण समिती सदस्यांची नियुक्ती होण्याची प्रक्रिया सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, या शिक्षण समितीमध्ये पक्षीय बलाबलानुसार नगरसेवकांचा समावेश होणार आहे. याकरिता या प्रस्तावाला दिलेली उपसूचना खंडीत करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

No comments:

Post a Comment