Pages

Saturday, 12 May 2018

डॉ. रॉय यांचा पदभार काढला

  • डॉ. पवन साळवे यांना “न्याय’?
  • महापालिका वर्तुळात चर्चा : दोघांच्या वादात प्रशासन अडचणीत
पिंपरी  – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाचे विभागप्रमुख आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांचा पदभार काढून अतिरिक्‍त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
डॉ. रॉय आणि डॉ. पवन साळवे यांच्यामध्ये पदोन्नतीवरून अनेक वर्षापासून वाद सुरु होता. या दोघांच्या पदोन्नतीच्या वादामध्ये पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था झाली होती. उच्च न्यायालयाची प्रकरणाला स्थगिती असल्याने यावर भाष्य करणे चुकीचे आहे असे विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सांगण्यात आले होते.

No comments:

Post a Comment