Pages

Wednesday, 2 May 2018

डिजीटल स्वाक्षरी असलेला सातबारा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य

मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून काल (दि.१ मे) महसूल विभागाच्या वतीने आयोजित डिजीटल स्वाक्षरीयुक्त सातबाराचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. सातबारा डिजीटाझेशनमुळे जमिनीच्या नोंदणीतील गैरव्यवहाराला आळा बसणार असून संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच, संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरी असलेला सातबारा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असणार आहे.

No comments:

Post a Comment