Pages

Sunday, 20 May 2018

महापालिका आयुक्तांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे ‘खिसे’ भरण्याचे काम केले – दत्ता साने

चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेत वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या भाजपाने कोणतेही ठोस काम केले नाही. केवळ जनतेच्या पैशाची लूट झाली आहे. आयुक्त हे भाजपचे प्रवक्ते आहेत. पालिकेतील प्रत्येक भ्रष्टाचारात आयुक्त सहभागी झालेत. स्थायी सभापती, महापौर, भाजप पदाधिकाऱ्यांचे ‘खिसे’ भरून देण्याचे काम आयुक्तांनी केले आहे. त्यासाठीच नागपूरहून त्यांना पिंपरीत आणले असल्याचा खळबळजनक आरोप दत्ता साने यांनी केला आहे. हे सर्व भ्रष्टाचार आता पुराव्यानीशी आपण बाहेर काढणार असल्याचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्रकार परिषदेत जाहिर केले.

No comments:

Post a Comment