Pages

Monday, 28 May 2018

भीम ऍपला दहा हजार रुपये ग्राहकाला परत देण्याचा ग्राहक मंचाचा आदेश

पाठविलेल्या खात्यातून पैसे गेले : मात्र, दुसऱ्या खात्यात जमाच नाही                             नुकसानभरपाईपोटी पाच हजार आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 3 हजार रुपये देण्यात यावेत
पुणे – भीम ऍपद्वारे कॉर्पोरेशन बॅंकेतून ऑनलाईन आयडीबीआय बॅंकेत वर्ग करुनही 10 हजार रुपये जमा न झालेल्या ग्राहकाला ग्राहकाच्या बाजूने ग्राहक मंचाने निकाल दिला आहे. ऍपमधील त्रुटीमुळे रक्कम जमा झाली नसल्याचे निरीक्षण नोंदवत ग्राहकाला दहा हजार रुपये परत देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक न्यायमंचाचे अध्यक्ष एम. के. वालचाळे, सदस्य शुभांगी दुनाखे, एस. के. पाचरणे यांनी दिला आहे. याबरोबरच नुकसानभरपाईपोटी पाच हजार रूपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून तीन हजार रूपये देण्यात यावेत, असेही मंचाने आदेशात नमुद केले आहे.

No comments:

Post a Comment